मराठी गोष्टी

वटवृक्ष आणि गवत

एक वडाचे झाड होते. 

त्याच्या आजूबाजूला हिरवळ होती, गवत होते. 

ते झाड त्या गवताला हिणवुन म्हणायचे “अरे काय तुमची पद्धत? तिकडुन वारा आला कि वाकले इकडे, इकडून आला कि वाकले तिकडे.. मी बघा माझ्या जागी स्थिर असतो. त्यामुळे लोक माझा आसरा घ्यायला येतात.”

काही दिवसांनी एक मोठे चक्रीवादळ आले. त्याच्या जोराने अनेक झाडे उन्मळून पडली. वटवृक्षाची सुद्धा तीच गत झाली. 

वादळ ओसरल्यावर गवत मात्र शाबुत होते. 

कधी कधी मोडेन पण वाकणार नाही असा ताठर बाणा आपले जास्त नुकसान करतो. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version