एके दिवशी एका कावळ्याला खुप तहान लागली होती. पण त्याला खुप फिरून पण पाणी सापडत नव्हते.
फिरत फिरत त्याला एक सुरई दिसली. उडत उडत तो त्या सुरईवर जाऊन पोहोचला.
त्या सुरईमध्ये पाणी तर होते, पण अगदी तळाशी.
त्या निमुळत्या तोंडाच्या सुरईमध्ये जाऊन पाणी पिणे कावळ्याला शक्य नव्हते.
आधीच तहानलेला तो, आणखीच निराश झाला.
पण त्याला आजूबाजूला दगड पाहुन एक शक्कल सुचली.
त्याने त्याच्या चोचीत छोटे मोठे दगड आणुन सुरईमध्ये टाकायला सुरवात केली.
दगडांमुळे तळाचे पाणी हळूहळू वर येण्यास सुरुवात झाली.
थोड्यावेळाने ते पाणी कावळ्याला पिता येईल इतके वर आले.
इतक्या मेहनतीनंतर शेवटी कावळ्याने आनंदाने आपली तहान भागवली.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take