एका गावात एक शेतकरी राहत होता.
तो म्हातारा झाला होता आणि मरायला टेकला होता.
त्याला आपल्या मुलांची काळजी होती कारण ते फार आळशी होते.
मरण्याआधी त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावले.
त्यांना सांगितले कि “पोरांनो आपल्या शेतात आपल्या कुटुंबाचा एक खजिना आहे. त्यामुळे आपलं शेत अजिबात विकु नका.”
मुलांनी हे समजल्यावर शेतात खोदकाम सुरु केले.
शेतात नेमकं कुठे खजिना आहे हे मुलांना दाखवण्याआधी तो शेतकरी देवाघरी गेला.
मुलांनी सगळं शेत खणुन पाहिलं. कुठेही खजिना सापडलाच नाही.
मुलांचा समज झाला कि आपल्या बाबांना शेवटी शेवटी भास झाले असतील त्यामुळे त्यांनी नसलेल्या खजिन्याबद्दल आपल्याला सांगितले असावे.
सगळीकडे खणल्यामुळे जमीन छान भूसभुशित झाली होती.
मुलांनी मग त्याचा फायदा घेऊन शेतात लागवड करण्याचे ठरवले.
त्यांनी पेरणी केली आणि आपापसात कामे वाटुन घेतली. शेताची उत्तम निगा राखली.
त्या हंगामात त्यांच्या शेतात उत्तम पीक आलं.
एवढं पीक त्यांच्या बाबांनाही घेता आलं नव्हतं कारण ते एकटेच शेतात राबायचे. एवढ्या जणांनी मिळुन शेती केलीच नव्हती.
त्या पिकाची कापणी करून जेव्हा त्यांना त्याबद्दल भरघोस मोबदला मिळाला त्या दिवशी त्यांना समजले हाच तो खजिना होता ज्याबद्दल त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं.
आपल्या शेताची काळजी घेऊन ते त्यातुन दरवर्षी हा खजिना मिळवु शकत होते. आपल्या बाबांनी जाता जाता दिलेली शिकवण त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take