एका सागवानाच्या झाडाजवळच एक काटेरी झाड होतं.
सागवान त्या झाडाला खिजवायला म्हणालं “तुझा कोणाला काही उपयोग नाही. माझं लाकुड पहा. उत्तम टिकाऊ म्हणुन प्रसिद्ध आहे. लोकांना त्यांच्या घरातल्या वस्तु माझ्याच लाकडाच्या असलेल्या आवडतात.”
काटेरी झाडाने लगेच उत्तर दिले. “बरंय माझं लाकुड प्रसिद्ध नाही तेच. त्यामुळे मला कसली चिंता नाही बघ. तुझ्यासारखी कधी कोणी लाकूडतोड्या येतो आणि माझ्यावर कुऱ्हाड चालवुन माझे तुकडे घेऊन जातो अशी कसलीच भीती नाही.
एखादा लाकूडतोड्या असा तुला घेऊन जाईल आणि सुताराला लाकडं विकेल तेव्हा तूसुद्धा अशीच प्रार्थना करशील कि पुढच्या जन्मी माझ्यासारखं साधं झाड व्हावंस.”
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take