एक कोंबडा इतर कोंबड्यांसोबत खुराड्यात दाणे टिपत होता.
दाणे टिपता टिपता त्याला एक सुंदर मोती सापडला.
कोंबडा तो मोती निरखुन बघु लागला.
मोती खुप छान दिसत होता.
कोंबडा मोत्याला म्हणाला “तु तर फार किंमती रत्न दिसतोस. पण तरीही तुझा मला काहीही उपयोग नाही. तुझ्यापेक्षा एखादा दाणाच माझ्या जास्त कामाचा आहे.”
असे म्हणुन कोंबड्याने त्या मोत्याला सोडुन पुन्हा दाणे टिपायला सुरुवात केली.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take