मराठी गोष्टी

कोल्ह्याला द्राक्षे आंबट

एका कोल्ह्याला भुक लागली होती. तेव्हा अन्न शोधत फिरत असताना त्याला एक द्राक्षाचा वेल दिसला. 

द्राक्षांचे बहारदार घड त्या वेलीला लटकलेले पाहुन कोळ्याच्या तोंडाला पाणी सुटले. 

तो त्या वेलीखाली गेला आणि द्राक्षे खाण्याचा प्रयत्न करू लागला. 

पण तो वेल कोल्ह्याच्या मानाने बराच उंच होता. त्याला बऱ्याच उड्या मारूनही द्राक्षे काढता आली नाहीत. 

शेवटी निराश होऊन कोल्हा उपाशी पोटीच पुढे निघाला. 

एक माकड बाजूला झाडावर त्याची मजा बघत बसला होता. त्याने कोल्ह्याची मस्करी करायला विचारले “काय कोल्हेबुवा, कशी वाटली द्राक्षे?”

कोल्ह्याला आपली फजिती कबूल करावी वाटली नाही. त्याने उत्तर दिले “अतिशय आंबट. असली फालतु द्राक्षे कोण खातो? मी तर चाललो जरा चांगली शिकार शोधायला.”

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version