एका कावळ्याला एक छान चीजचा तुकडा मिळाला.
तो आनंदाने झाडावर जाऊन खायला बसला.
एका कोल्ह्याने हे पाहिले.
कोल्हा उपाशी होता, कावळ्याच्या चोचीत तो चीजचा तुकडा पाहुन त्याच्या तोंडाला पाणी सुटले.
तो झाडाखाली गेला आणि कावळ्याशी बोलायचं प्रयत्न करू लागला. त्याचे फार कौतुक करू लागला.
तो म्हणाला “लोक उगीच त्या कोकिळेचं फारच कौतुक करतात बाबा. खरं तर तुझा आवाज सुद्धा किती मस्त आहे. पण लोकांना तुझी किंमतच नाही. मला मात्र तुझा आवाज फारच आवडतो. जरा गाऊन दाखव कि.”
अशी मखलाशी ऐकुन कावळा खुश झाला आणि त्याने गायला तोंड उघडले. त्याने काव काव करताच तो तुकडा खाली पडला तो कोल्ह्याने पटकन झेलला आणि फस्त करून टाकला.
कावळ्याची पुरती फजिती झाली.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take