मराठी गोष्टी

गाढव आणि टोळ

एकदा एका गाढवाने टोळाचे गाणे ऐकले. 

त्याचे गाणे ऐकुन गाढवाला स्वतःलासुद्धा गावे असे वाटायला लागले. 

त्याने त्याच्या भसाड्या आवाजात सुर आळवणे सुरु करताच बाकी प्राण्यांनी त्याला थांबवले. 

गाढव निराश झाला. 

त्याने टोळाला विचारले कि तु इतका छान कसा गातोस? तु काय खातोस ज्याने तुला एवढं छान गाता येतं?

टोळ म्हणाला मी फक्त दवबिंदुच पितो. बाकी काही खात नाही. 

गाढवाने ठरवले कि आता तसेच करायचे. तो फक्त गवतावर दवबिंदु चाटायला लागला. त्याने गवत आणि पाने खाणे बंद केले. 

त्याला त्याच्या इतर गाढव मित्रांनी फार समजावले पण त्याने काही ऐकले नाही. 

दवबिंदु पिऊन गाढवाचे पोट भरणे शक्यच नव्हते. गाढव शेवटी उपासमारीने मेले पण त्याला टोळासारखे गाणे जमलेच नाही.

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version