एक कुबड्या होता. कुबडामुळे तो वाकुन चालायचा.
त्याला आसपासचे लोक फार चिडवायचे. त्याची खिल्ली उडवायचे. त्याच्यासमोर त्याची नक्कल करायचे.
तो फार दुःखी राहायचा.
एक दिवस देवाला त्याच्यावर दया आली.
देव त्याच्यासमोर प्रकट झाला आणि म्हणाला
“आजवर तु फार सहन केलंस. आज मी तुझं व्यंग दुर करतो. पण तुझी अजुन एखादी इच्छा असली तर सांग.”
कुबड्या म्हणाला
“देवा, आजवर मला माझ्या गावातल्या लोकांनी फार त्रास दिला. त्यामुळे तु त्या सर्वांना कुबडे कर.”
देव हे ऐकुन नाराज झाले.
“अरे मूर्खा, आज मी स्वतः येऊन तुझे व्यंग दूर करतो म्हणालो आणि तुला अजून इच्छा मागण्यास सांगितले. तुला स्वतःसाठी आणखी उद्धार करण्याची संधी असताना तू मात्र दुसऱ्यांचे वाईट चिंततोस? दुसऱ्यांनी तुला चिडवले असले तरी तुझे व्यंग काही त्यांच्यामुळे आले नव्हते. तू मात्र दुसऱ्यांना व्यंग यावे अशी इच्छा धरतोस? तुझ्या शरीराचे व्यंग सहज दूर होईल पण मनातले व्यंग मात्र अवघड आहे. मी आता परत चाललो. तु आहे तसाच रहा.”
तो कुबड्या त्यापुढे तसाच राहिला.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take