मराठी गोष्टी

बेडूक आणि बैल

एका तळ्यात काही बेडके राहत होती. 

त्यापैकी एक बेडुक प्रचंड गर्विष्ठ होता. 

त्याला तो सोडून दुसऱ्या कोणाचेही कौतुक सहन होत नसे. 

एकदा त्याचा एक बेडुक मित्र दूरवर फेरफटका मारून आला. 

त्याला वाटेत एक बैल दिसला होता. 

तो त्या बद्दल सांगत होता.. “मी वाटेत एक अजस्त्र प्राणी पाहिला..

फार फार मोठा, डौलदार.. एवढी मोठी शिंगं होती त्याला. 

काय रुबाबदार दिसत होता. मी आजवर कधीच एवढा मोठा प्राणी पाहिला नव्हता. 

मला फार भीती वाटली, त्याला पाहिलं आणि परत फिरलो.” 

हे ऐकुन गर्विष्ठ बेडुक चिडला. 

“त्यात घाबरण्यासारखं काय आहे? केवढा तरी मोठा असेल असा?”

त्याने मोठ्ठा श्वास घेऊन आत हवा भरली. “एवढा?”

मित्र म्हणाला “नाही रे, फार मोठा होता” 

त्याने अजुन हवा भरली.

तरी मित्र म्हणाला “नाही रे, तुला समजत नाहीए. श्वास सोड तु. आपल्यापेक्षा फार मोठा होता.” 

गर्विष्ठ बेडकाने काही त्याचं ऐकलं नाही. 

तो आणखी आणखी श्वास आत घेत हवा भारत गेला.  

त्याचं शरीर प्रचंड फुगत गेलं. 

तो काही बैलाएवढा झालाच नाही, पण इतकावेळ एवढी हवा आत रोखून धरल्यामुळे श्वास कोंडुन तो मरून गेला. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

Exit mobile version