लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दलितांमध्ये जागृती झाल्यावर पुढे आलेले एक प्रमुख साहित्यिक होते. त्यांचे मूळ नाव नाव तुकाराम भाऊराव साठे. १ ऑगस्ट १९२० रोजी सांगलीमध्ये एका दलित कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
त्यांना फक्त चौथीपर्यंतच शिकता आले. दुष्काळ पडल्यामुळे हे लहान असताना त्यांचे कुटुंब पायी पायी चालत मुंबईला स्थलांतरित झाले. मुंबईमध्ये त्यांना पडेल ते काम करावे लागले. त्याकाळी दलितांना दिली जाणारी वागणूक, गरिबांचे काबाडकष्ट, समाजामध्ये असलेली विषमता हे सर्व त्यांनी खूप जवळून पाहिले.
त्या काळात भारतीय स्वातंत्र्यलढा, फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रेरणेने चालणाऱ्या दलितांच्या उद्धारासाठी कार्य, सशस्त्र क्रांती, साम्यवाद असे अनेक राजकीय प्रवाह चालू होते. अण्णाभाऊ सुरुवातीची काही वर्षे कार्ल मार्क्सच्या कम्युनिसीम म्हणजेच साम्यवादाने प्रेरित झाले होते.
अमर शेख सारख्या कलावंतांसोबत त्यांनी लाल बावटा कलापथकामधे बरेच कार्य केले. त्यांनी आपल्या कथा कादंबऱ्या आणि गीतांमधुन दलितांची वेदना, त्यांच्यावर होत असलेला अन्याय, गरिबांचे हाल यावर लक्ष वेधले. तमाशा, लावणी, पोवाडा अशा बाजांचा त्यांनी आपल्या गीतांमध्ये वापर केला.
डॉक्टर आंबेडकरांपासुन प्रेरणा घेत ते दलित चळवळीत सहभागी झाले. आंबेडकरांमुळे दलितांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती होत होती. त्यातून अनेक जण आपल्या लेखनातुन व्यक्त व्हायला लागले. दलित साहित्य हा एक नवीन प्रकार उदयास आला. अण्णाभाऊ साठे हे आद्य दलित साहित्यिक होते.
त्यांनीच दलितांच्या साहित्याला बळ मिळावे, व्यासपीठ मिळावे म्हणुन दलित साहित्य संमेलन सुरु केले. इतर तरुण साहित्यिकांना प्रोत्साहन दिले.
त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या फकिरा या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता.
कला आणि सामाजिक क्षेत्रातल्या आपल्या भरीव कामगिरीमुळे ते दलित समाजासाठी पूजनीय बनले. लोकशाहीर, लोकरत्न, साहित्यरत्न अशा पदव्या लोकांकडूनच त्यांना मिळाल्या.
कमालीची प्रतिभा, तीव्र संघर्ष आणि संवेदनशीलता यामुळे ते सर्वांसाठीच एक प्रेरणास्थान आहेत.
महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर काही वर्षातच वयाच्या ४८व्या वर्षी त्यांचा १८ जुलै १९६९ रोजी मृत्यू झाला.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take