
एकदा एक बेडुक जंगलात बढाया मारत हिंडायला लागला.
तो सगळ्या प्राण्यांना सांगत होता मी फार मोठा वैद्य आहे.
कुठलाही आजार असु द्यात तो मी झटदिशी बरा करू देऊ शकतो.
कोणाला काहीही रोग झाला तरी माझ्याकडे या, मी इलाज करेल.
एका कोल्ह्याने त्याला अद्दल घडवायला विचारले
“असं जर आहे वैद्य महाराज, तर तुम्ही स्वतःवर काही इलाज का करून घेत नाहीत?
तुम्ही स्वतः असे एवढूसे आणि रोगट दिसता, नीट चालता ही येत नाही.. तुम्ही तुमची औषधं घेऊन आधी स्वतः दणकट होऊन दाखवा बरं”.
हे टोमणे ऐकुन बेडूक खजील होऊन निघुन गेला.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take